Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्फोटक पदार्थांची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

09-Mar-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

पुणे - बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पेठनाका येथे अवैधरित्या स्फोटक पदार्थांची वाहतूक करणार्‍या दोघांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिलेटीन बॉक्ससह चारचाकी गाडी असा ५ लाख २८ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी किसन नारायणलाल कुमावत (वय २४), अमृत लच्छीराम गुजर (वय ४० दोघेही सध्या रा. येडेनिपाणी ता. वाळवा, मूळ गाव रायपूर कुमावत मोहल्ला, जि.भिलवाड) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , पेठनाका येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास इस्लामपूर पोलिस गस्त घालत होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter