Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इचलकरंजीत प्राध्यापकास डांबून मारले : तरुण जेरबंद

09-Mar-2019 : सांगली /प्रतिनिधी

इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्राध्यापकास डांबून मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेतले, या गुन्ह्यातील अमित जगन्नाथ ढगे (वय २४, रा.कुंडल, ता.पलूस, जि.सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले .

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत असताना पो.ना. बिरोबा नरळे यांना अमित ढगे हा त्याच्या कुंडलमधील घरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कुंडलमधील त्याच्या घरात जाऊन त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने इचलकरंजीतील गुन्हा हा साथीदाराच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.

याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात खात्री करण्यात आली. त्या ठिकाणी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. त्याला शहापूर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा , पो.नि.श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, विजयकुमार पुजारी, अमित पारित, संजय कांबळे,निलेश कदम, बिरोबा नरळे,संदीप पाटील, विकास भोसले,शशिकांत जाधव, सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने पार पडली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter