Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘त्या’ खूनप्रकरणातील हल्लेखोर अद्याप फरारीच

09-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री लव्हली सर्कल पासून लक्ष्मी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर झालेल्या हॉटेल कामगार सुरेश पाष्टे (वय ५०, रा.संजयनगर) यांच्या खूनप्रकरणी अद्याप काहीही धागेदोरे पोलिसाच्या हाती लागले नसून पाष्टे यांच्यावर २८ वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

मयत सुरेश पाष्टे हे भारती विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. कामावरून ते रात्री ८ च्या सुमारास घरी परतत असत.शुक्रवारी रात्री ९ वाजून गेले तरी ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला, तसेच मोबाईल वरूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला , मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter