Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कोकळेत वाहनाच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

09-Mar-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथे शाळेतून घरी जात असताना शाळकरी मुलगा विनोद आकाराम दुधाळ (वय ११, मूळ गाव देवनाळ ता.जत, सध्या रा.कोकळे ता. कवठेमहांकाळ) याला चार चाकी गाडीने धडक दिल्याने ठार झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनोद दुधाळ पाचवीमध्ये शिकत होता, तो सध्या कोकळे येथे मामाजवळ शिक्षणासाठी राहत होता. त्याची शनिवारी सकाळ ची शाळा असल्याने शाळा साडे अकरा वाजता सुटली होती, शाळा सुटल्याने विनोद सायकलवरून मामाच्या घरी जात असताना जतकडून कवठेमहांकाळला जाणारी महेंद्र पिकअप या दूध वाहतूक करणार्‍या चार चाकी गाडीने धडक दिल्याने विनोद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान विनोदचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस विजय घोलप करीत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter