Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
हिवरे तिहेरी खून प्रकरणी सुनावणी सुरू ऍड.निकम यांच्या टोल्याने साक्षीदार गोंधळले

11-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

हिवरे (ता.खानापूर) येथील तिहेरी खूनप्रकरणाची येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. करंजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणारे डॉ. ए. बी. कवाडे यांची सोमवारी साक्ष झाली. त्यांच्या साक्षीत तफावत दिसून येताच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांना ‘डॉक्टरसाहेब, डॉक्टरकी पुन्हा शिका’ असा टोला लगावला. त्यामुळे डॉ. कवाडे चांगलेच गोंधळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलीस हवालदार पी. आर.मंडले यांचीही साक्ष झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.

हिवरे (ता. खानापूर) येथील शिंदे वस्तीवर तीन वर्षांपूर्वी सुनीता पाटील, निशिगंधा शिंदे व प्रभावती शिंदे या तीन महिलांचा खून करण्यात आला होता. त्यापैकी दोन महिलांचे शवविच्छेदन करंजे (ता.खानापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. ए. बी. कवाडे यांनी केले होते. ऍड. निकम यांनी डॉक्टरांची साक्ष घेतेवेळी त्यांना चाकू दाखवत अंगावरील जखमा या चाकूच्या वारामुळेच झालेल्या आहेत का, अशी विचारणा केली. तसेच चाकूनेच या जखमा होवू शकतात का, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी डॉ. कवाडे चांगलेच गोंधळले

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter