Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जत मुख्याधिकार्‍यांचा मनमानीपणा सभापतींनी पालिकेस ठोकले टाळे

11-Mar-2019 : जत /प्रतिनिधी

जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे हे सदस्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवत असून त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालिकेचे स्वच्छता विभागाचे सभापती लक्ष्मण ऊर्फ टिमु एडके यांनी सोमवारी सकाळी पालिकेस टाळे ठोकले. सभापतींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. यावेळी सभापती एडके व मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली .

याबाबत अधिक माहिती अशी की , सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पालिकेत मुख्याधिकारी हे आपले कामकाज करीत होते. यावेळी सभापती लक्ष्मण एडके तिथे आले. त्यांनी मुख्याधिकारी हराळे यांना दस्त नोंद कर्मचारी अस्लम करोली यांना निवडणुकीचे काम देऊ नका, सध्या मार्च एंडींगची कामे आहेत. लोकांची अडवणूक होते. त्या बदल्यात आरोग्य विभागाचा किंवा इतर दुसरा कर्मचारी द्या, अशी विनंती केली. यावरून मुख्याधिकारी हराळे व सभापती एडके यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter