Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वाळव्यात दाम्पत्याची आत्महत्या

14-Mar-2019 : वाळवा /वार्ताहर

वाळवा येथील अल्लाउद्दीन करीम अत्तार (वय ५०) व त्यांची पत्नी शहनाज अल्लाउद्दीन आत्तार (वय ४७) या पति पत्नींनी वाळवा पेठभाग येथे राहत्या घरी दिनांक १२ मार्च रोजी मध्यरात्री प्राशन करून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत आष्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

वाळवा येथील पेठभागमध्ये अल्लाउद्दीन करीम अत्तार हे आपल्या पत्नीसह अनेक वर्षापासून राहत आहेत, वाळवा ही त्यांची सासुरवाडी, शहनाज अल्लाउद्दीन आत्तार या अंगणवाडी सेविका म्हणून गावातच काम करीत होत्या, तर पती अल्लाउद्दीन पोस्ट खात्यामध्ये सेवेत होते, १२ मार्च रोजी रात्री या दांपत्याने विष प्राशन करून घरी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, शेजारी राहणार्‍या थोरात नामक शिक्षिकेने नेहमीप्रमाणे शाळेकडे जाताना शहनाज अत्तार यांना घराबाहेरून हाक मारली, पण दरवाजा बंद होता, बराच वेळ प्रतिसाद येत नाही म्हटल्यावर थोरात यांनी नेहमीच आत्तार मॅडम लगेच प्रतिसाद देत असतात पण आज बराच वेळ झाला, आतून कसलाच प्रतिसाद नाही , दरवाजा पण बंद आहे हे परिसरातील लोकांच्या लक्षात आणून दिल्यावर जवळ राहणारे नातेवाईक, आणि नागरिक यांनी घराचे दरवाजा उघडला असता घडलेला प्रकार उघड झाला .

याबाबत शहनाज अत्तार यांचे चुलत बंधू अजीज मेवेकरी (वय ५८) यांनी आष्टा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिसांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह आष्टा येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

लग्नाला वीस वर्षे होऊन अपत्य होत नसल्याने पती-पत्नी या कारणानेच चिंतेत होते त्यामुळेच त्यांनी आपले जीवन संपविले असावे असा स्थानिक नागरीक आणि पोलिसांचा अंदाज आहे, घटनास्थळावर विषाच्या दोन मोकळ्या बाटल्या दिसून आल्या, घराला दोन्ही बाजूने कडी घालून या दांपत्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे , शहनाज यांनी सुरुवातीला फास लावून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले आहे,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter