Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अवैध दारूसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

15-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध व्यवसायांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. या विभागाकडून दि. १० ते १३ मार्च या कालावधीत एकूण ९ गुन्हे नोंदविले असून, एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, १३ लाख ४६ हजार ५५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सांगलीसह मिरज, विटा, इस्लामपूर तसेच जिल्हाभर कडक कारवाई आरंभली आहे. बेकायदेशीर दारू विक्री करणारी दुकाने, हॉटेल्स, ढाब्यांची पडताळणी सुरू आहे , तसेच, तीन विशेष दक्षता पथके नियुक्त केलेली आहेत. ही पथके २४ तास जिल्ह्यासह सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत. या पथकांमार्फत संशयास्पद हॉटेल, खानावळी, ढाबे व संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. सीमावर्ती भागातून बेकायदेशीर मद्य तस्करी होवू नये, म्हणून तात्पुरते सीमा तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत.

आचारसंहिता कालावधीत सर्व हॉटेल्स, धाबे वेळेतच बंद व्हावेत, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके गस्त घालत आहेत. गेल्या तीन दिवसांत एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter