Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विट्यातील लॉजवर छापा मंगरुळचे दोघे ताब्यात

15-Mar-2019 : विटा / प्रतिनिधी

विटा येथील औद्योगिक वसाहतीमधील विराट लॉजवर गुरूवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात मंगरुळ (ता.खानापूर) येथील दोन तरुणांसह शालेय दोन विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहरातील अनेक लॉजमध्ये राजरोसपणे प्रेमीयुगलांची वर्दळ असते. त्यामुळे या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आणखी काही लॉजवर कारवाई कधी ? असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विटा येथील विराट लॉजवर काही युवक - युवती असभ्य वर्तन करीत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कन्हेरे यांच्यासह पथकाने सायंकाळी लॉजवर छापा टाकला. त्यावेळी मंगरुळ येथील प्रथमेश बाबूराव शिंदे (वय २२) आणि सुरज भरत शिंदे (वय ३१) यांच्यासह दोन शालेय मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी प्रथमेश शिंदे, सुरज शिंदे आणि लॉज मालक राहूल गणपती जाधव (रा.कार्वे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित युवकांचे नातेवाईक दुपारपासून पोलिस स्टेशन आवारात तळ ठोकून होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter