Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दोन टोळीतील सहाजण तडीपार

15-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील दोन टोळयांतील ६ सराईत गुन्हेगारांना सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यंातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्वप्निल घोंगडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सुभाष पिंटू आप्पासो गोसावी, (वय २७), विकास गोसावी, (वय २३, दोघे रा. बागणी, ता. वाळवा) विकी प्रकाश गोसावी, (वय २१, रा. मांगले, ता. शिराळा) यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. सुभाष गोसावी व त्याच्या साथीदारांनी सन २०१४ ते २०१७ पासून टोळी करून सशस्त्र दरोडा घालणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत होते. या टोळीविरुध्द सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील औंध व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, हातकणंगले, कळे पोलीस ठाणेत ७ गुन्हे दाखल आहेत. या टोळीची सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात दहशत होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter