Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कुपवाडमध्ये एकाच रात्रीत आठ घरे फोडली : २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

30-Mar-2019 : कुपवाड / वार्ताहर

कुपवाड - माधवनगर रस्त्यालगत असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील आठ घरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सहा घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु दोन घरांतील कुटुंबांना चाकूचा धाक दाखवून २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.

रोहित सुदाम कदम(वय २०), शुभम् राजाराम गोसावी (वय २१), रोहित गणेश गोसावी (वय २३, तिघेही रा.अहिल्यानगर, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter