Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश शेंडगे लढणार

30-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलला आहे. जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी मागे घेत राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे.

सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार प्रकाश शेंडगेंचे नाव आघाडीने निश्चित केले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाख धनगर समाजाचे मतदान आहे. प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाजाचे नेते आणि ओबीसी नेते म्हणून आहे. शिवाय जयसिंग शेंडगेंपेक्षा ते राजकारणात अधिक सक्रीय आहेत. त्यामुळेच प्रकाश शेंडगेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter