Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ओमनीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

30-Mar-2019 : मिरज / प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील मालगाव येथील शास्त्रीनगर येथे राहणार्‍या शमा दस्तगीर अष्टेकर (वय ५२) यांना सकाळी फिरायला जात असताना ओमनी गाडीने (क्र. एम.एच.१० ए.जी.३२९०) पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला . चालक अविनाश शशिकांत व्हनकांबळे याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल झााली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , शमा अष्टेकर या सकाळी नेहमीप्रमाणे मालगाव-मिरज मार्गावर फिरायला जात असताना त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ओमनी व्हॅनने भरधाव वेगाने येवून अष्टेकर यांना पाठीमागून धडक दिली.

ओमनीच्या धडकेने अष्टेकर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात नेले . तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. वाहन चालक अविनाश शशिकांत व्हनकांबळे विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter