Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीचा फरारी गुंड बाळू भोकरे गजाआड

30-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

सराईत गुन्हेगार बाळू भोकरे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे जेरबंद केले. बाळू भोकरे हा सांगली शहर पोलिसाना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात हवा होता.

याबाबत अधिक माहिती अशी की , दि.५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास आष्टेकर हॉस्पिटल ते गणेशनगर येथे मिलिंद प्रकाश चिणके (रा.गणेशनगर, भुईराज हौसिंग सोसायटी) याचा बाळू भोकरे व त्याच्या ४ ते ५ साथीदारांनी तलवारीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील ३ आरोपी धिरज बाबासो कोळेकर (वय २१, रा. गणेशनगर), धिरज दिलीप अहिरे (वय २६, रा.गणेशनगर), अक्षय माणिक शिंदे (वय २६, रा.गणेशनगर) यांना शहर पोलिसानी अटक केली होती. या गुन्ह्यातील बाळू भोकरे हा फरारी होता. पो.नि. श्रीकांत पिंगळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बाळू भोकरे हा आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे असल्याची माहिती मिळाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter