Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

30-Mar-2019 : मिरज / प्रतिनिधी

मिरजेतील आळतेकर हॉल येथे खा.संजयकाका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासंदर्भात आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात भाषण करताना भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिले तर पाच लाख रूपये बक्षिस देवू असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने त्यांच्यावर मिरज शहर पोलिसात आचारसंहिता कक्ष प्रमुख संजय चिल्लाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिरजेतील आळतेकर हॉलमध्ये मिरज शहर पश्‍चिम भाजपा अध्यक्ष गणेश आप्पासाहेब चौगुले यांच्या नियोजनाखाली महायुतीच्यावतीने निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात खासदार, आमदार तसेच मिरज पूर्व भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना पृथ्वीराज देशमुख यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाने खा.संजयकाका पाटील यांना मताधिक्य दिल्यास पाच लाख रूपये देवू असे जाहीर पणे सांगितले. पृथ्वीराज देशमुख यांनी मतदारांना पाच लाख रूपयाचे बक्षिस देण्याचे प्रलोभन दाखविल्याने त्यांनी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे निदर्शनास आले. पृथ्वीराज देशमुख यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात मिरज विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र आचारसंहिता कक्षप्रमुख संजय चिल्लाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter