Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बसर्गी - बिळूर मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

01-Apr-2019 : जत /प्रतिनिधी

जत तालुक्यातील बसर्गी -बिळुर मार्गावर दुध वाहतुक करणारी पीकअप गाडी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदाशिव गिरमल्ला वळसंग (वय ४०, रा. मलकंद्रहट्टी, जि. विजापूर) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात निलेश सुरेश व्हनवाडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव यांची पत्नी निता या माहेरी अमृतवाडी येथे काही दिवसांपासून राहत आहेत. त्यांच्या मुलावर अथणी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासाठी सदाशिव पत्नी निता व मुलाला घेऊन जाण्यासाठी येत होते. मात्र, निता व त्यांची आई दोघेही अथणीला निघाले होते.

दरम्यान, सदाशिव अमृतवाडीस जाऊन परत आपल्या दुचाकीवरून अथणीच्या दिशेने निघाले होते. ते बसर्गी ओलांडून चार ते पाच किलोमीटर गेले असता कवळ्ळी ते अथणी दुध वाहतूक करणार्‍या महिंद्रा पीक अप (क्र. केए २३, ए. ८५८२) ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने सदाशिव डांबरी रस्त्यावर आदळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने जखमी ्रअवस्थेत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन गुंडरे करत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter