Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जयंतरावांनीच शेट्टींकडे माझी शिफारस केली

01-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात दादा-बापू वाद पेटवून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढले व स्वत: सत्तेत शिरले. त्यामुळे आता पाडापाडीचे राजकारण बंद करणे काळाची गरज आहे. आ.जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे पालकत्व आहे. त्यांनीच माझ्या उमेदवारीचे नाव घेतले. त्यामुळे ते माझे पालकत्व स्विकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल, असा विश्‍वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केला.

महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक येथील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. या बैठकीला उमेदवार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपातील गट नेते मैनुद्दीन बागवान, पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदी उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, दादा-बापू वाद पिढीजात सुरू आहे. सांगलीची जागा स्वाभिमानीला जाण्यामागे आ.जयंत पाटीलच असतील, अशी खदखद मनात होती. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य असे मी म्हणालो.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter