Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विशाल पाटील आज अर्ज दाखल करणार

01-Apr-2019 : सांगली प प्रतिनिधी

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल पाटील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकासमोर प्रचाराचा शुभारंभ होणार असून या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजता सांगली येथील गणपतीचे दर्शन घेऊन स्टेशन चौकात सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कॉंग्रेसचे आ.विश्‍वजीत कदम, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आ.मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, माजी आ. सदाशिव पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, महिला कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हा अध्यक्षा मनिषा रोटे, अनिता सगरे आदी उपस्थित राहणार आहेत. विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ स्टेशन चौकातून होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून विशाल पाटील जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशाल पाटील अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते जाणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter