Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बोरगावजवळ चिमुकली ट्रकखाली चिरडली

02-Apr-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

मिरज - पंढरपूर मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांव नजिक वाळूच्या ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शाळकरी चिमुकली जागीच ठार झाली तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.

अपघातात कु.आरुषी हणमंतराव पाटील (वय ६) ही पहिलीच्या वर्गात शिकणारी चिमुकली जागीच ठार झाली तर परशराम पाटील (वय ८०) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघेही शिरढोण येथील रहिवासी आहेत. जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाता बाबत अधिक माहिती अशी की, शिरढोण येथील रहिवासी परशराम पाटील हे टी.व्ही.एस. लुना बनावटीच्या गाडीवरून ( क्र. एम.एम.१० व्ही. एस.८२२४) नात कु.आरुषी हिला बोरगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोहोचविण्यासाठी दुचाकीवरून जात होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter