Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वंचित आघाडीची उमेदवारी पडळकरांच्या गळ्यात

02-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते (उद्या) बुधवारी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत , तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षांच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकार्‍यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी राबविला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीकडून प्रथम जयसिंगतात्या शेंडगे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली , मात्र सोमवारी नागपूर येथे गोपीचंद पडळकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, मला उमेदवारी मिळू नये, म्हणून एक मोठा नेता कार्यरत होता. त्याने स्वाभिमानीच्या उमेद वारीत खोडा घातला. वंचित आघाडीच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु झाल्यानंतर आपले आरएसएस, शिवप्रतिष्ठानच्या नेत्यांबरोबर असलेले फोटो व्हायरल केले , मात्र हे भाजपमध्ये असताना होते.

दि. २५ जुलै २०१८ रोजीच भाजपला सोडचिठ्ठी देवून धनगर आरक्षणासाठी लढायला सुरुवात केली आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना भेटलो असेन तर केवळ आरक्षणाच्या चर्चेसाठीच. त्यांचे धोरण बहुजनांच्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने संविधान रक्षणाचा, सर्वसामान्यांच्या अधिकाराचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेले

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter