Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
खासदारांना गुंडगिरी करायला निवडून दिले का?

02-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

खासदार म्हणतात माझी संग बघितली आता जंग बघा मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. या जंगला आम्ही घाबरत नाही. तासगाव येथे येऊन तुमची गुंडगिरी मोडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी देत तुफान फटकेबाजी केली , तर झाल्या गेल्या चुका माफ करून आ.जयंत पाटील, आ.विश्‍वजीत कदम व आ.सुमनताई पाटील यांनी साथ द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

येथील स्टेशन चौकात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, खासदारांना दादागिरी व गुंडगिरी करायला सांगलीकरांनी निवडून दिलेले नाही. मला म्हणतात, आता माझा जंग बघा, कंबरेला बंदूक लावून फिरले म्हणजे धाडसी होत नाही. तासगावात आ.सुमनताई पाटील यांना घरात कोंडून दगडफेक केली म्हणजे मर्दानगी सिध्द होत नाही. जंगाला आम्ही घाबरत नाही. तासगावात येऊन तुमची दादागिरी मोडून काढू. सांगलीत फक्त वसंतदादांच्या प्रेमाचीच दादागिरी चालते, भाजपने माझ्या आडवे येऊ नये. हातात बॅट आहे, त्यामुळे या निवडणुकीत छक्केच मारणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.

सांगली चांगली करण्याची व वसंतदादांचे विचार सांगलीत कायम ठेवण्याची ही निवडणूक आहे. वसंतदादा पाटील यांनी शेतकरी चळवळ सुरू केली होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter