Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पत्नीवर खुनी हल्ला : पतीस सक्तमजुरी

03-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे (वय-४०, रा.कानडवाडी, ता.मिरज) यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस.एस.सापटणेकर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की , सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड एमआईडीसी रस्त्यावर १२ जुलै २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता. यातील फिर्यादी सौ.सविता सुरेश कांबळे हिचे सुरेश सोबत १४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुरेश हा गवंड्याच्या हाताखाली मजुरी करीत होता. घटनेपूर्वी १ महिन्यापासून तो सविताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. घटनेदिवशी सकाळी सुरेशने सविताला शिवीगाळ व मारहाण करून आज तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन तो घरातून निघून गेला होता. त्याच्या धमकीमुळे सविताने घाबरून मैत्रिणीच्या मोबाईलवरून आईला फोन करून नवर्‍याने दिलेल्या धमकीबाबत सांगून माहेरी घेऊन जाण्यास सांगि तले.त्यानंतर सविताची आई तिला घेऊन जाण्यासाठी काननवाडी येथे आली.ती सविताला घेऊन एमआईडीसी रस्त्यावरून चालत निघाली होती.त्यावेळी सुरेश हा त्यांच्या पाठीमागून सायकलवरून आला. त्याने खिशातून चाकू काढून पत्नी सविताच्या डाव्या मांडीवर,डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार केले.सविताची आई तिला वाचवण्यासाठी मध्ये आली असता त्याने सासूच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार केले. व तो सायकलवरून पळून गेला. सविता व तिची आई उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter