Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जांभूळवाडी फाट्याजवळ टॅ्रक्टर ट्रॉलीने चिरडल्याने जवान ठार

03-Apr-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

वाघवाडी फाटा ते रेठरेधरण मार्गावरील जांभूळवाडी फाट्याच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीने चिरडल्याने जितेंद्र रामचंद्र धनवडे (वय ३१) या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाने अपघातानंतर घटना स्थळावरून पलायन केले, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी , आझर्डे (ता.वाळवा) येथील जितेंद्र धनवडे हे सात वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहेत. १० दिवसांपूर्वी सुट्टी काढून ते घरी आले होते. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीयू ५६३९) जितेंद्र धनवडे हे वाघवाडी फाटा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. वाघवाडी फाटा येथून रेठरेधरणकडे परतत असताना जितेंद्र धनवडे यांच्या दुचाकीला वाघवाडीकडे जाणार्‍या ट्रॅक्टरने जांभूळवाडी फाट्याच्या वळणावर धडक दिली. या अपघातात टॅ्रक्टर ट्रॉलीचे पाठीमागील चाक दुचाकीस्वार जितेंद्र धनवडे याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याची कवटी फुटून ते जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली जागेवर सोडून टॅ्रक्टर चालक राम मधुकर माळी याने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती जितेंद्र याचा भाऊ राहुल धनवडे यांना फोनवरून मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter