Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तासगावात तीन लाखांच्या स्फोटकांचा साठा जप्त

03-Apr-2019 : तासगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. यात ५८७ जिलेटीनच्या कांड्या , ४४७ डिटोनेटर्स व एक ट्रॅक्टर असा सुमारे ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रतनलाल लालूराम गुजर व शंकरलाल लालूराम गुजर रा. राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना बनकर म्हणाले पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा , अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता अनुषंगाने अवैध्य धंद्यंावर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter