Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विट्यात देशी-विदेशी दारूसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

05-Apr-2019 : - एकास अटक

विटा /प्रतिनिधी

विटा - कराड रस्त्यावरून विनापरवाना होणारी दारूची वाहतूक विशेष पोलिस पथकाने पकडली. कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल (रा.विटा) आणि ओमनी चालक मंगेश उत्तम जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ओमनी चालक मंगेश उत्तम जाधव (वय २३, रा.सूर्यनगर) यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , विटा-कराड रस्त्यावर विनापरवाना देशी - विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पथकाने विटा - कराड रस्त्यावरील कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ एक ओमनी गाडी (क्र. एम एच ४५, ए ३०२५) तपासासाठी थांबविली. यावेळी या गाडीतून १ लाख ५२ हजार १६० रुपयांच्या देशी - विदेशी दारूच्या बाटल्या, २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि दारू वाहतूक करणारी गाडी असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ओमनीचालक मंगेश जाधव आणि ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशेष पथकाचे पोलिस कर्मचारी गौतम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नागनाथ निचळ करीत आहेत.

चेकपोस्ट कर्मचारी गांधारीच्या भूमिकेत?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विटा पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावल्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter