Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेट्टींकडून ‘त्या’ वक्तव्याबद्दल दिलगिरी

05-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

‘सैन्यात आपली पोरं जातात. देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत’ असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं. या वक्तव्याबद्दल खा.राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून अनवधनाने उल्लेख झाल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुलकर्णी, देशपांडे यांची मुले सैन्यात नसतात. असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघाने खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवाय, आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे खा.शेट्टी यांच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरली होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter