Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘लागीर’मधील दोन्ही ‘राहुल्यां’ना १६ लाखांचा गंडा

05-Apr-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ‘लागीर झालं जी’ फेम फास्टर राहुल्या व स्लोवर राहुल्या या दोघांना तब्बल १६ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संतोष साहेबराव जामनिक (रा.रेपाडखेडा, ता.मोरतीजापूर, जि.अमरावती) व विलास गोवर्धन जाधव (रा.मोगरा, ता.बडनेरा, जि.अमरावती) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , इस्लामपूर येथील केशव उर्फ राहुल जगताप व पेठ (ता.वाळवा) येथील राहुल संभाजी मगदूम यांची कोल्हापूर येथे कृष्णदेव पाटील यांच्याशी नोकरीसंबंधी चर्चा झाली होती. कृष्णदेव पाटील याने पुणे येथील अक्षय मिश्रा व विलास जाधव यांना इस्लामपूर येथे २ जून २०१६ रोजी बोलावून घेतले. त्यावेळी राहुल जगताप व राहुल मगदूम या दोघांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावतो असे सांगून प्रत्येकी ८ लाख रूपयांची मागणी केली. त्यावेळी राहुल मगदूम याने १ लाख रोख तर राहुल जगतापने १ लाखाचा चेक दिला. त्यावेळी अक्षय मिश्रा व विलास जाधव यांनी गोवर्धन जाधव, संगिता जाधव, लता पवार, मनिषा जाधव, स्वप्निल कश्यप या नातेवाईकांचे खाते नंबर देवून त्याच्यावर उर्वरित रक्कम जमा करण्याचे सांगून नोकरीची हमी दिली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter