Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ना.चंद्रकांतदादांचा आज सांगली, मिरजेत प्रचार दौरा

07-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

राज्याचे महसूल मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील आज सोमवारी दि.८ रोजी महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारानिमित्त सांगली दौर्‍यावर येत आहेत.

सोमवारी सकाळी ५ वा. २२ मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवर त्यांचे आगमन होत आहे. ते हॉटेल आयकॉन येथे जाणार आहेत. सकाळी ७ वाजता ते महावीर उद्यान येथे जाणार असून त्या ठिकाणी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर आमराई उद्यान येथेही ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत, सांगलीतील भेटीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर ते मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जाणार आहेत. याही ठिकाणी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ते विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.खरे मंगल कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सांगलीत विविध ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांत व मेळाव्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter