Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

07-Apr-2019 : कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हातकणंगले पोलिस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

भरारी पथक क्रमांक तीनचे प्रमुख मेघराज घोडके यांनी याबाबतची फिर्याद दिली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी प्रचार सुरू केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter