Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संजयकाका समर्थकांकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप

07-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांकडून एका डिजीटल मिडिया संपादकाला दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यासाठीच पक्षात विरोध झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली होती. मोदी लाटेत त्यांचा विजय देखील झाला. मात्र गेल्या पाच वर्षातील त्यांची कामगिरी पक्षाला घातकच ठरली आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे खासदार पाटील यांचे कट्टर समर्थक होते. मात्र त्यांच्यावर अन्याय केल्याने त्यांनी भाजप सोडून लोकसभेला थेट संजयकाकांना आव्हान दिले आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे पक्षातर्ंगत विरोध जास्त आहेत. आ.सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ.सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदींनी खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केल्याची चर्चा होती.

मात्र भाजपने उमेदवारी दिली नाही तर ते कॉंग्रेसकडे जाऊ शकतात. या भितीने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. असा गौप्यस्फोट देखील गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेत केला होता. आता जरी काकांच्या प्रचारासाठी सर्व नेते एकत्र आले असले तरी मनाने नेते व त्यांचे कार्यकर्ते अग्रभागी सहभागी झाल्याचे चित्र दिसत नाही, तर दुसरीकडे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील व बहुजन वंचित आघाडीचे उमदेवार गोपीचंद पडळकर यांनी काकांवर थेट हल्ला चढवत गुंडगिरी मोडून काढणार असल्याचा इशारा दिला आहे. आ.सुमनताई पाटील यांच्यावर केलेल्या हल्ल्याची चर्चादेखील सुरू आहे. काकांची गुंडगिरीची चर्चा या निवडणुकीत ऐरणीवर आली आहे.

त्यामध्येच संजयकाकांच्या कार्यकर्त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे प्रसिध्द केल्याबद्दल एका मिडिया संपादकाला दूरध्वनी करून शिवीगाळ केली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter