Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आरेवाडी येथील बिरोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ : हजारो भाविकांची उपस्थिती

10-Apr-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

धनगर समाजाचे आराध्य दैवत व सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेस बुधवारी सुरूवात झाली.

यात्रेच्या पहिल्या दिवशी पलूस तालुक्यातील येळावी येथील श्री गावडे यांचा मानाचा गोडवा नैवेद्य दाखविण्यात आला.त्यानंतर प्रसाद वाटप करून यात्रेला सुरूवात झाली. महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्र प्रदेशातून धनगर समाज बांधव यात्रेनिमित्त येण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे पन्नास हजारांवर भाविकांनी हजेरी लावली आहे.

गुरूवार दि.११ रोजी यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सार्वजनिक गोडवा नैवेद्य आहे. तीन दिवस चालणार्‍या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter