Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेतकरी बँकेच्या इमारतीवर महापालिकेचा डोळा

10-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या मिरज रस्त्यावरील मुख्य इमारतीचा लिलाव काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ही इमारत घेण्यासाठी महापालिका सरसावली आहे. तशी चर्चा देखील सुरू झाली आहे. मात्र अंतिम निर्णय महासभा घेणार आहे.

रिझर्व्ह बॅँकेमार्फत वसंतदादा बॅँकेचा परवाना निलंबित करण्यात आला. या बँकेत महापालिकेने ३२ कोटी रुपये ठेवले होते. त्यावरील व्याजासह ही रक्कम ६५ कोटीपेक्षा अधिक आहे. पालिकेच्यावतीने वारंवार पाठपुरावा करूनही ही रक्कम अद्याप महापालिकेला मिळालेली नाही. सांगली-मिरज रस्त्यावरील मुख्यालयासह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे

मुख्यालयाची इमारती विक्री करण्याच्या हालचाली अवसायकामार्फत सुरू झाल्यानंतर ही इमारत महापालिकेने घ्यावी, असा विचारही सुरू झाला आहे. महापालिका प्रशासनानेही त्यादृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यालयाच्या इमारतीची किंमत ४ ते ५ कोटीच्या घरात होईल.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter