Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेतकर्‍यांना साले, लावारीस म्हणणार्‍यांना शरम वाटत नाही का?

12-Apr-2019 : तासगाव / प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकर्‍यांना साले म्हणतात, प्रवक्ते आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना लावारिस म्हणतात, भाजप सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. मोदी सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. मोदींनी शेतकरी व शेती उद्ध्वस्त केला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी तासगाव येथे केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर यु टर्न मारणारे शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे हे अफझलखानाच्या वळचणीला कसे गेले? चोर असणारे चौकीदार त्यांना प्रामाणिक कसे वाटू लागले?, असे सवाल खा.राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या. प्रत्येक सभेत त्यांनी माझ्यावर टीका केली. आमचा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे जाहीरातींवर खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे मोदींकडून माझी फुुकटची प्रसिध्दी केली जात आहे. कधी घरात भांडण म्हणतात, कधी अधिकार नाही म्हणतात. राष्ट्रवादीची सत्ता हातातून निसटली आहे, पण तुम्हाला का काळजी? पक्ष एकट्या दुकट्या नाही. मात्र आमची चिंता यांना का पडली हेच कळेा झाले आहे.

आमच्या कुटूंबावर आईचे संस्कार आहेत. घर मोठे आहे. वगेळे असले तरी कुटूंबात एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. तुम्हाला घरच नाही. चिंता करायची गरज नाही. ज्याला घर करायचे माहित नाही, सांभाळायचे माहित नाही,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter