Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
समाज भाजपच्या दावणीला बांधून ऑफर स्विकारणारे आम्ही नाही : ब्रम्हानंद पडळकर

12-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

धनगर समाजाला भाजपच्या दावणीला बांधून पद मिळवायचे नव्हते. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर डावलली . गुंडगिरी व संस्था बुडविणार्‍या दोन्ही प्रस्थापितांना घरी बसविण्याची ही वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी संघटीत व्हावे व जनतेत असणार्‍या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विजयी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी प्रचार बैठकीत केले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ ब्रम्हानंद पडळकर यांनी कवलापूर येथील महासिध्द मंदिर व बुधगाव येथे प्रचार बैठका घेतल्या. या बैठकीला एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शकिल पिरजादे, नानासाहेब वाघमारे, अशरफ वांकर, हाफीज मोहम्मद मुल्ला, दीपक एडके, प्रफुल्ल मोटे, साहिल खाटीक, कवलापूर वसंतदादा पाटील पाणी पुरवठ्याचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, महासिध्द पतसंस्थेचे माजी अध्यक्ष वैभव माने, आबासाहेब हाक्के आदी उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter