Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विशाल यांचा वेटिंग पिरिएड संपला : विश्‍वजीत

12-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

डॉ.पतंगराव कदम व वसंतदादांचा स्नेह मोठा होता. राजकारणात कदम साहेबांना देखील वाट पहावी लागली होती. एकदा वेटिंग पिरीयड संपल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही , तसेच विशाल पाटील यांचे झाले आहे. त्यांचा वेटिंग पिरियड संपला आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन डॉ. विश्‍वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांनी व्यक्त केला.

सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचा पलूस तालुका झंझावाती प्रचार दौरा वसगडे येथून बैठकीने सुरू झाला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विशाल पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरूणआण्णा लाड, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, महेंद्र लाड, नेमगोंडा पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, महावीर पाटील, सुनिल पाटील-डिग्रजे यांच्यासह वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ व सुखवाडी या गावातील नागरिक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

डॉ. विश्‍वजीत कदम पुढे म्हणाले, लोकसभेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक आहे. डॉ.पतंगराव कदम साहेब व वसंतदादांचा स्नेह मोठा होता. विशालदादांनी संपर्क कमी झाल्याची चूक कबूल केली हे त्यांचे मोठेपण आहे. एकेकाळी कदमसाहेबांना सुद्धा वाट पहावी लागली होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter