Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मोदींनी केलेले काम हाच आमचा प्रचार : ना.प्रभू

12-Apr-2019 : मोदींनी केलेले काम हाच आमचा प्रचार : ना.प्रभू

सांगली प प्रतिनिधी

गेल्या ५ वर्षांतील पंतप्रधान मोदींनी केलेली कामे जनतेला माहिती आहेत. त्यामुळे केलेले काम हाच आमचा प्रचार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न डोळ्यासमोर ठेऊन र्निर्णय घेणारे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

राजमतीभवन येथे महायुतीचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या व्यापारी, उद्योजक, सी.ए, इंजिनिअर यांच्या मेळाव्यात ना.प्रभू बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक नगरसेविका भारती दिगडे यांनी केले. यावेळी बोलताना खा.संजयकाका पाटील म्हणाले, ‘ विविध योजनांच्या माध्यमातून मोदींनी सर्वसामान्यांचा विकास केला.

जिल्ह्यातून जाणारे ४ राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतले. राहिलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी मला तुम्ही मतरुपी आशिर्वाद द्या असे आवाहन केले.

ना.प्रभू पुढे म्हणाले, ‘संजयकाका आजचे आणि उद्याचेही खासदार आहेत , जर आपले काम नसेल तरच अधिक प्रचार करावा लागतो. गेल्या ५ वर्षांत जेवढी कामे झाली आहेत तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. आता प्रचाराची गरज नाही तर मताच्या आशिर्वादाची गरज आहे.मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी ज्याप्रमाणे जनआंदोलन सुरु आहे, तशीच परिस्थिती सांगलीत आहे. ५ वर्षांपूर्वी देशातील परिस्थिती चिंताजनक होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परिस्थिती सुधारली आहे. देशातील उद्योगपतीही देशात गुंतवणूक करण्यास उत्सुक नव्हते. आज देशात महागाई कमी आणि सीमा सुरक्षित आहेत. झालेल्या हल्ल्यांना मोदी सरकारने चोख उत्तर दिले आहे.आता इमारत बांधून होत आली असून कळस चढवायचा बाकी आहे. त्यासाठी सत्तेची गरज आहे.मोदींना अनेक देशांनी मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter