Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला साथ द्या ः डॉ.भारत पाटणकर

14-Apr-2019 : कडेगाव / प्रतिनिधी

पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांना साथ द्या, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. कडेपूर येथे राजलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी विशालदादा पाटील, मोहनराव यादव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कदम, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरूणअण्णा लाड, प्रकाश जगताप यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter