Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शिरगावात पिस्तुल हस्तगत : एकास अटक

14-Apr-2019 : तासगाव / प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील शिरगाव गावचे हद्दीत बेकायदा बिगरपरवाना पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या खानापूर तालुक्यातील सुनिल अनिल पवार (वय २१ रालेगरे कारखाना रोड, ता.खानापूर ) तासगांव पोलीसांनी ताब्यात घेऊन ७० हजार रूपये किंमतीचे काळे रंगाचे देशी बनावटीचे एक पिस्तुल जप्त केले आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा , अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराडे यांनी सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्या तसेच लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने अवैध शस्त्रे विक्री करणार्‍या टाळ्या अग्निशस्त्रांचा वापर करणारे गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रे विक्री करणार्‍या टोळया अग्नीशस्त्राचा वापर करणारे गुन्हेगार यांची माहिती काढण्याबाबतची पावले तासगांव पोलीसांची पडत आहेत.

दि १४ एप्रिल रोजी पो .कॉ . सोमनाथ मुंडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुनिल पवार हा तालुक्यातील शिरगाव गावी, तासगांव - विटा जाणार्‍या रोडवर असलेल्या एस.टी पिकअप शेडसमोर बेकायदा बिगरपरवाना शस्त्र विक्रीसाठी येत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter