Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पोलीस हल्ल्याप्रकरणी सलीम मुल्लासह तिघांना मिरजेत अटक

14-Apr-2019 : कोल्हापूर / प्रतिनिधी

यादवनगर येथे मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा व पथकावर हल्ला करून फरारी झालेले मुख्य संशयित मटकाबुकी सलीम यासीन मुल्ला (वय ४१) त्याचा भाऊ फिरोज यासीन मुल्ला (वय २८) आणि अभिजित आनंदा येडगे (वय ३०, तिघेही रा. यादवनगर, कोल्हापूर) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरज येथे जेरबंद केले.

गेल्या आठ दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. यापूर्वी पोलिसांनी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका शमा मुल्ला यांच्यासह गुन्ह्यातील २५ संशयिताना अटक केली आहे. तर सलीम मुल्ला याच्यासह ४० जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) लावण्यात आला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter