Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकर यांची सांगलीत प्रचारफेरी

14-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराचा सुपर संडे साधत सांगली शहर व परिसरात झंझावती प्रचार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी एसटी स्टँड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अनेक मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. प्रस्थापितांविरोधात बहुजनांची लाट तयार झाली आहे. या परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी सामील व्हावे व मला विजयी करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.

सांगली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सांगली शहर परिसरात प्रचार दौरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी मध्यरात्री एसटी स्टँड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी तरूणांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. रविवारी सकाळी भीमनगर परिसरासह अनेक ठिकाणी मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. तरूणांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. दिवसभर शहरातील अनेक नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी त्यांच्या बैठकादेखील झाल्या.

त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांची दादागिरी सुरू आहे. खासदारांनी जिल्ह्याचा कोणताही विकास केलेला नाही. दादागिरी व धमकी देण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे , मात्र आता जनता हे सहन करणार नाही. त्यांची दादागिरी मोडून काढू, असा इशारा त्यांनी दिला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter