Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वंचित आघाडी हे भाजपचेच पिल्लू : आ.जयंतराव

19-Apr-2019 : वंचित आघाडी हे भाजपचेच पिल्लू : आ.जयंतराव

पलूस / प्रतिनिधी

वंचित आघाडी हे भाजपचेच पिल्लू आहे त्यामुळे धनगर समाजाने त्यांना मते दिली तर ती अप्रत्यक्षरित्या भाजपला जातील त्यामुळे त्यांनी विशाल पाटील यांना मते द्यावीत. शहीदांच्या बलिदानावर मते मागणारे व समाजाची फसवणूक करणार्‍या भाजपला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केले. पलूस येथे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख, निरीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया सुधारल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही,मोदी सरकार हे राजेशाही आणू पाहत आहेत, ते कधीही भाषणात विकासावर बोलत नाहीत, ते फक्त टीका करतात, या सरकारने सामान्यांच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे, न भुतो, न भविष्यती अशी बेकारी देशात वाढली आहे याला सर्वस्वी मोदी सरकार कारणीभूत आहेत , नोटा बंदीच्या वेळी १५० लोकांना मरण आले, आणि यातून काहीही साध्य झाले नाही त्यामुळे नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा होता हे सिद्ध झाले आहे. या सरकारने लोकशाहीच्या चारही स्तंभावर हल्ले केले आहेत, राफेल करारामध्ये झालेला जुना करार रद्द करून नियमबाह्य करार या सरकारने केला. मनुष्य हत्येपेक्षा गोहत्या श्रेष्ठ मानणारे हे सरकार आहे,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter