Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजेत विशाल पाटील यांची प्रचार फेरी

19-Apr-2019 : मिरज प प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या फेरीत खा. राजू शेट्टी, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह मिरजेतील कॉग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, महिला सहभागी झाले होते.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी चौकातून या प्रचार फेरीस सुरुवात झाली. प्रचार फेरीवेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. गांधी चौकापासून सुरू झालेल्या रॅलीमध्ये मिरजेतील मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हलगीच्या निनादात ही रॅली काढण्यात आली.

ही प्रचार फेरी गांधी चौक, शिवाजी पुतळा, गणेश तलाव, शनिवार पेठ, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, दर्गा परिसरमार्गे जवाहर चौकात आल्यानंतर येथे जाहीर सभा झाली.

महापौर किशोर जामदार, विजयराव धुळूबुळू, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, प्रा.सिध्दार्थ जाधव, नगरसेवक करण जामदार, अतहर नायकवडी, संजय मेंढे, संगीता हारगे, बबीता मेंढे, वहिदा नायकवडी, वंदना चंदनशिवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदा डावरे, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, तानाजी पाटील यांच्यासह शहरातील कॉग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter