Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी राहील...

19-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देऊ शकते त्यामुळे हा समाज भाजपच्याच पाठीशी राहील. कुणाची धाव कुठपर्यंत आहे, हे मला चांगले माहित आहे तेव्हा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी संजयनगर येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना केले.

कोणीही चार दिवसांपुरता येईल, तुम्हाला भूलवेल आणि निघून जाईल , पण तुम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका कारण कोणाची धाव कुठंपर्यंत आहे हे मला चांगले माहित आहे. असे प्रतिपादन रा.स.प.चे अध्यक्ष तथा राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी संजयनगर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना केले.

महायुतीचे उमेदवार खा.संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ संजयनगर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्वागत जिल्हाध्यक्ष मारुती सरगर यांनी केले.ना.जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .रासपचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी, ‘आताची वंचित नाहीतर किंचित आघाडी आहे’ गतवेळी २३ पैकी केवळ एकाचीच डिपॉझीट शिल्लक राहिले होते.१२ मार्च १९९७ ला धनगर आरक्षणासाठी महादेव जाणकार यांनीच पहिला मोर्चा काढला होता असे सांगितले. माजी आ. रमेश शेंडगे म्हणाले, ‘दिल्लीत ज्यांचे सरकार असते तेच खासदार आपले प्रश्न सोडवू शकतात.यापूर्वीच्या सरकारने दिलेली कोणतीही आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. फुले,शाहू आंबेडकरांचे मतं आपल्या पदरात पडून घेतली जात होती. सत्ता आल्यावर मात्र आपल्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. संजयकाकांनी केंद्राच्या माध्यमातून विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणला. कॉंग्रेसने अधिवेशनात आम्ही धनगरांना आरक्षण देतो असे कधीही म्हटले नाही असे सांगून ८ पान ५ वर..

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter