Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘महांकाली’ कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरूच

27-Apr-2019 : कवठेमहांकाळ / वार्ताहर

कामगारांचा थकीत पगार देण्यात यावा , तसेच विविध मागण्यांसाठीं महांकाली कारखान्याच्या कामगारांनी कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले व बेमुदत काम बंद व साखर वाहतूक बंद आंदोलन सुरू केले आहे.

कामगारांना प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पगार द्यावा , फंडाची व ग्रॅच्युईटी रक्कम, १८ टक्के व १५ टक्के फरकाची रक्कम द्यावी, यांसारख्या विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रीय कामगार संघ यांच्यावतीने महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. काम बंदचा आज शनिवारी चौथा दिवस आहे.

यावेळी ३१ जुलै२०१८ रोजी या सर्व मागण्यांचे निवेदन चेअरमन व कार्यकारी संचालक यांना दिले होते व त्यांनी या सर्व मागण्या मान्य केल्याचे दि.३१ जुलै रोजीच लेखी पत्र दिले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter