Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दुष्काळाच्या सोयी-सुविधा तात्काळ द्या, अन्यथा आंदोलन

02-May-2019 : सांगली/ प्रतिनिधी

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यात दुष्काळाने कहर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे. दुष्काळासाठी शासनाकडून जाहीर केलेल्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात, अशी मागणी कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे गुरुवारी केली. टँकर मागूनही जाणीवपूर्वक दिले जात नसल्याचा आरोप करीत दुष्काळी उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यांवर येवून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेवून जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती मांडली. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्‍याची प्रचंड टंचाई आहे. चारा आणि पाण्याविना जनावरे, पशु-पक्षी यांचे हाल होत आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगत प्रशासनाकडून दुष्काळी सुविधांची अंमलबजावणी होत नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास दुष्काळाच्या भयंकर अडचणींना सामोरे जावे लागेल.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter