Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मोटरने मागून धडक दिल्याने एकजण ठार

02-May-2019 : सांगली /प्रतिनिधी

कोल्हापूर रोडने सांगलीकडे येणार्‍या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कोडा या चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बबन नलवडे हे जागीच ठार झाले तर मागे बसलेली त्यांची पत्नी मंगल या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बबन नलवडे आणि त्यांची पत्नी मंगल हे त्यांच्या नव्या ऍक्टिवावरून कोल्हापूर रोडने सांगलीकडे येत होते. ते मारुती शोरूमसमोर आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या स्कोडा (क्र. एम.एच.०९ डी.एम.२१७४) या चारचाकीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गाडीवरून उडून पडले. यामध्ये बबन नलवडे हे जागीच ठार झाले , तर मंगल यांना चारचाकीने काही अंतर फरफटत नेल्यामुळे त्या जखमी झाल्या .त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह . या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे अंदाजे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिसानी चारचाकीचा चालक श्रीप्रसाद पर्वतरेड्डी वडगीरे (रा. जयसिंगपूर) यास अटक केली आहे. पोलिसानी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter