Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपूर येथे एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त : दोघांना अटक

02-May-2019 : इस्लामपूर /प्रतिनिधी

भारतीय चलनातून बाद झालेला ब्लॅक मनी टक्केवारीवर बदलून व्हाईट करण्यासाठी निघालेल्या दोघांना ९९ लाख ९७ हजार ५०० रूपयांसह इस्लामपूर येथे सापळा रचून जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी दीपक प्रल्हाद वाकते ( वय ३४, रा. जुळेवाडी, ता. कराड) व दत्तासिंग हरिसिंग हजारे ( वय १८, रा. किल्लेमच्छिंद्रगड ता. वाळवा) या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना मंगळवार दि. ७ मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली , तर ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter