Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गेल्या पाच वर्षांत दिलेल्या अंदाजापेक्षा झाला कमी पाऊस

15-May-2019 : मुंबई / प्रतिनिधी

हवामान विभागासह देशातील मान्सून पावसाचा अंदाज स्कायमेट आणि काही इतर खासगी संस्था जाहीर करतात. या संस्थांच्या अंदाजावर शेतकरी आणि कृषी कंपन्या यांचे आगामी खरीप व रब्बी हंगामाचे बजेट ठरते , मात्र, या संशोधन संस्थांच्या अंदाजावर शेती करणे कितपत योग्य आहे , असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही संस्थांचे मागील पाच वर्षांतील मान्सूनच्या पावसाचे अंदाज बर्‍यापैकी चुकले आहेत हे विशेष.

२०१४ ते २०१८ या कालावधीत भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी जाहीर केलेल्या अंदाजात बर्‍यापैकी तफावत आहे. तरीही यापैकी एकाही संस्थेचे अंदाज आणि त्या वर्षी झालेला पाऊस यांची आकडेवारी काही जुळू शकली नाही. एकूणच देशातील हवामानशास्त्र आणि संशोधक नेमके काय करीत आहेत

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter