Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दुष्काळी उपाययोजनांसाठी जि.प.अध्यक्ष करणार दौरा

15-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद झाली आहे. शासनानेही दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्यापही ठोस उपाययोजना राबविण्यात तांत्रिक अडचणी आहेत. बहुतांशी तालुक्यांत पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेत केवळ टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे टंचाईच्या उपाय योजनांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख लोकसभा निवडणूक मतमोजणीनंतर दुष्काळी गावांचा दौरा करणार आहेत. चारा छावण्यांना भेटी देऊन चारा-पाण्या बाबतची माहिती घेणार आहेत. संबंधित तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना सोबत घेवून बैठका घेतल्या जातील, असेही अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाने दडी मारल्याने खरीपासोबत रब्बी हंगाम वाया गेला. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आली . शासनाने टंचाईची माहिती घेऊन जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळी म्हणून जाहीर आले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टंचाईचे उपाय होण्याची आवश्यकता होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter