Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विवाहितेची आत्महत्या नातेवाईकांचा खुनाचा आरोप

15-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

येथील सौ.दिपाश्री सागर ओलेकर (वय २२, रा.विद्यानगर, वारणाली) या विवाहितेने राहत्या घरात साडीने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली . दरम्यान तिच्या नातेवाईकांनी तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे .

दिपाश्री हिचे २०१३ साली सागर याच्याशी लग्न झाले होते. तिला ४ वर्षांचा एक मुलगा आहे. तिचा नवरा मेडिकलमध्ये कामाला आहे. तिच्या मामाने तिचा सांभाळ केला होता. दिपाश्री ही शिक्षणासाठी मामाकडे होती. मामानेच तिचा सांभाळ केला होता. तिचे मुळगाव विजापूर मधील बल्लोळी हे आहे. मामा जत तालुक्यातील वळसंग येथे राहतो. दीपाश्रीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. प्रथम तिचे शवविच्छेदन सांगलीच्या शासकीय रूग्णालयात करण्यात येणार होते, परंतू दिपाश्रीच्या नातेवाईकांनी तिचे शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी केल्याने तिचा मृतदेह मिरजेला नेण्यात आला. तिथे दिपाश्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या पश्‍चात पती, सासू, सासरा, दोन नणंदा असा परिवार आहे. दिपाश्रीच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसात तक्रार देणार असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter